Shivaji Maharaj statue collapsed: ‘हा आपटे कोणाच्या तरी मुलाचा मित्र, त्याने पैसे किती खाले?’; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर थेट हल्ला

Shivaji Maharaj statue collapsed | Aaditya Thackeray | Jaideep Apte: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा फक्त आठ महिन्यांमध्ये कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट उसळलीय. याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आलं.
मात्र हा मोर्चा होण्यापूर्वीच राजकोटवर कट्टर विरोधक खासदार नारायण राणे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना आमने-सामने येऊन आले. एवढेच नाही तर नेत्यांच्या समोरच एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार सुद्धा याठिकाणी घडला.
एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राजकोटवर पोहोचले असतानाच खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पुतळ्याची ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले. दरम्यान हा सर्व प्रकार सुरू असतानाच ठाकरे गटाचे आणि भाजप समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार सुद्धा घडला.
एकमेकांच्या कार्यकर्त्यांना ओढून मारण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पुतळा पाहणीचा जो कार्यक्रम होता तो बाजूला पडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
त्यांना वाटत असेल आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या असतील
हा सगळा गोंधळ सुरु असताना ठाकरे गटाकडून सुद्धा पोलिसांना इशारा देण्यात आला. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जर आम्हाला पंधरा मिनिटांमध्ये रस्ता करून दिला नाही, तर शिवसेना रस्त्यावरची संघटना आहे आम्ही सुद्धा दाखवून देऊ असा इशारा दिला.
यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर बोचरा वार केला. त्यांना वाटत असेल आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या असतील, पण तसं काही नाही म्हणत एक प्रकारे नारायण राणे यांना राजकोट किल्ल्यावर बोचरा वार करण्याचा प्रयत्न केला.
हा आपटे कोणाच्या तरी मुलाचा मित्र आहे. त्याने पैसे किती खाले?
आदित्य ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम या मिंदे सरकारने कोणाला दिलं हे समोर यायला हवं. कोण आहे हा आपटे? समुद्रकाठी उभारलेला हा पुतळा आठ महिन्यात पडला. गेट वे ऑफ इंडियाला देखील शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याला काही झालं नाही.
मग हा पुतळा कसा कोसळला. ज्याने पुतळा उभारला त्या आपटेला फरार होण्यास कोणी मदत केली असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. भाजपाने रेवन्ना नावाच्या राक्षसाला जसं पळायला मदत केली.
तसं या आपटेला पळू दिलं का, हे आपटे कोण आहे? कुठे गेले? हे आम्हाला पोलिसांनी सांगतिलं पाहिजे. हा आपटे कोणाच्या तरी मुलाचा मित्र आहे. त्याने पैसे किती खाले असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
‘जयदीप आपटे’ नेमका कोण? वाचा सविस्तर…..
लहानपणापासून कलाक्षेत्राची आवड असल्याने जयदीप आपटेने आठवीत असतानाच या क्षेत्रात जाण्याचे ठरवले होते. कल्याणमधील त्यांच्या शाळेच्या रस्त्यावरच शिल्पकार सदाशिव साठे यांचा स्टुडिओ आहे. त्याचा प्रभाव जयदीपवर शालेय दशेपासूनच होता.
मूळ गाव कल्याण असून आई-वडील दोघेही नोकरी करायचे. जयदीपचे दहावीपर्यंतचे शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टची पदविका व नंतर जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचा डिप्लोमा केला.
जयदीप आपटे हा २५ वर्षांचा तरुणानेच राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या २ ८ फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारला आहे. २ ८ फूट उंच हा पुतळा उभारण्यासाठी साधारण ३ वर्षांचा कालावधी लागतो.
पण हा पुतळा जून २ ० २ ३ मध्ये बनविण्यास सुरुवात केली. अवघा सात महिन्यामध्ये हा पुतळा तयार करण्यात आला. अशी माहिती जयदीप आपटेकडून सनातन दैनिक या वृत्तपत्राला काही महिन्यांपूर्वी देण्यात आली होती.
त्याने मुलाखतीत पुतळा विषयी केलेले विधान चर्चेतही आले होते. ‘जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल…’ असेही आपटे म्हणाला होता. शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभारू शकतो कि नाही अशी भीतीही त्याने व्यक्त केली होती.
मुलाखतीत त्याने सांगितले होते, ’या पुतळ्याच्या कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊन गेला. संधी मोठी आहे, सगळं व्यवस्थित पार पडले तर सगळीकडे नाव होईल, पण जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल, असे वाटले.. पण म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे.. संधी हातातून सोडायची नाही.’
त्याने पुढे सांगितले, हा ३५ फुटी उंच पुतळा उभा करताना जयदीला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार होते. पुतळ्याला विलंब होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. ‘सहा फुटांचे मॉडेल पूर्ण झाल्यावर ते थ्रीडी स्कॅन केले गेले. स्कॅन केल्यावर खरे तर मॉडेल सीएनसी तंत्राने फोममध्ये कोरायचे ठरले होते.
पण काही गणिते चुकली आणि ठरलेल्या वेळेत काम होणार नाही, अशी चिन्हे दिसू लागली. तेव्हा अचानक पूर्ण मॉडेल थ्रीडी प्रिंट करण्याचे ठरवले. मित्रांनी अक्षरशः एका रात्रीत १८ नवीन प्रिंटर उभे केले आणि प्रिंटिंगचे काम सुरू झाले व पुढे पुतळा उभा झाला’ असेही त्याने सांगितले.
‘कदाचित हे काम होणार होते म्हणूनच की काय, या कामाच्या आधी 3 – 4 शिल्पे बनवण्याची संधी मिळाली होती. ती अगदी दीड दोन फुटांची होती; पण ती करताना अभ्यास होत होता. जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी मला विचारणा झाली ती ‘एखादा पुतळा तयार करणार का?’, अशी. भारतीय नौदल काम करून घेणार.
त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार म्हणून मग मीच ठरवले की, काम करायचे. एका आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे ३ लहान नमुने (मॉडेल) बनवले. त्यातील २ नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवले आणि तिसरा नमुना अक्षरशः अचानक घडलेले शिल्प होते आणि नेमके तेच शिल्प निवडले गेले, असे जयदीप आपटेने मुलाखतीत सांगितले होते.





