दौंड तालुक्यातील खामगावात तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून

पुणे : विद्येचे माहेर घर असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथे अज्ञात कारणावरुन दाजीने मेव्हण्याचा कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.
आज शनिवारी (ता. 03) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास खामगाव गावचे हद्दीतील घडामोडी चौकात हि घटना घडली आहे. सुरज राहुल भुजबळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे.
‘या’ कारणामुळे केला खुन
बहिणींना घरी आणले म्हणून दाजीने मेव्हण्याला संपवले. अमोल बहिरट असे आरोपीचे नाव आहे. चौकातील दुकानात घुसून आरोपी अमोल बहिरटने कोयत्याने 15 ते 16 वार करत ही हत्या केली. हत्येचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास करत आहेत.





