परभणीत खळबळ…! छत्रपती संभाजी महाराजांचं स्टेटट्स ठेवल्याने तरूणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

परभणी : औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता परभणीतील गंगाखेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील नगरेश्वर गल्ली येथील तरुणाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबत स्टेटस ठेवल्याने जवळच असलेल्या राज मोहल्ला येथील जमावाने त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
अविनाश उमा खवडे (वय २२, रा. नगरेश्वर गल्ली, गंगाखेड) असं मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक काळे यांनी भेट देत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात ताणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश खवडे याने शुक्रवारी दुपारी इन्स्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात तलवार व औरंगजेबचा फोटो असलेली स्टोरी ठेवली होती. या रागातून रात्री साडेआठ वाजता फैजल याने तुला तौफिकने बोलावल्याचे सांगत मस्जिदकडे बोलावले. त्याठिकाणी आणखीन मुले जमवत असल्याचे बघून अविनाश नगरेश्वर गल्लीतील महादेवाच्या मंदिराजवळ गेला. तिथे आयान रिजवान, फैजल याच्यासह चार ते पाच जण आले व त्यांनी तू स्टोरी का ठेवली? म्हणून मारहाण केली
यावेळी मंदिराजवळ उपस्थित असणाऱ्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. गोंधळ वाढत असल्याने अविनाश याने पोलीस स्टेशन गाठले. त्याच्या फिर्यादीवरून आयान, रिजवान, फैजल (सर्व रा. राज मोहल्ला) याच्यासह अनोळखी एक, अशा चार जणांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास गंगाखेड पोलीस करत आहेत.





