‘त्या’ कोरोनाबाधिताच्या संपर्कातील गुणवडी येथील एक तरुण कोरोना पॉसिटीव्ह !
Updated On:

बारामती : सूर्य नगरीतील कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कातील गुणवडी येथील एक तरुण कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. काल रात्री 15 स्वॅब नमुने घेतले होते त्यापैकी 14 निगेटिव्ह आले.
सूर्य नगरीतील पेशंटच्या संपर्कातील गुणवडी येथील 1 तरुण पॉसिटीव्ह आलेला आहे. तसेच आज सकाळी इतर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व काही संशयित असे 36 नमुने घेतलेले आहेत त्याचा अहवाल प्रतीक्षेत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे यांनी सांगितले.
शहरात दोन दिवसापासून लॉक डाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





