अतूट मैत्रीची धमाल गोष्ट! ‘अॅाल इज वेल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सयाजी शिंदेंची असणार भन्नाट भूमिका

Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांचा एक नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव अॅाल इज वेल असून, आप्पा या भाईच्या भूमिकेत अभिनेते सयाजी शिंदे दिसणार आहेत. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या २७ जूला हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे.
सयाजी शिंदे हे त्यांच्या आजवरच्या केलेल्या अनेक दमदार भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली आहे. अमर,अकबर, आणि अँथनी या तीन मित्रांच्या अतूट मैत्रीची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केली आहे. या चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. आप्पा ही भाईगिरी करणाऱ्या डॉनची व्यक्तिरेखा असली तरी त्यात काहीतरी वेगळेपणा आणि रंगत आणावी या उद्देशाने आमच्या लेखक-दिग्दर्शकांनी शुद्ध मराठी भाषेची गंमत त्या व्यक्तिरेखेसाठी वापरली आहे. शुद्ध मराठी भाषेच्या गोडव्यामुळे ही व्यक्तिरेखा आणि त्यातली गंमत खुलली आहे, असे या पात्राविषयी बोलताना सयाजी शिंदे यांनी सांगितले.
‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्याव्यक्तिरिक्त या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदी कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा: “आपल्या दहशतवाद्यांनी निशस्त्र सैन्याला…” ; राजस्थानच्या मंत्र्यांची जीभ घसरली, काँग्रेसचा हल्लाबोल





