“कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली”; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लता मंगेशकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. ट्विट करत त्यांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. शब्दात सांगू शकत नाही असे दुःख मला झाले असलत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
I am anguished beyond words. The kind and caring Lata Didi has left us. She leaves a void in our nation that cannot be filled. The coming generations will remember her as a stalwart of Indian culture, whose melodious voice had an unparalleled ability to mesmerise people. pic.twitter.com/MTQ6TK1mSO
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2022
रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकर यांचे निधन झाले, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयतील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली. कोविडची लागण झाल्यापासून 28 दिवसांहून अधिक कालावधीनंतर अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले.





