पुणे जिल्हा | गावठी दारु विक्रेता दिड वर्षासाठी तडीपार

वाघोली, (प्रतिनिधी) – लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वारंवार गावठी हातभट्टीची दारु विक्री करणार्या शामकांत विष्णू सातव (रा. आव्हाळवाडी रोड, डोमखेलवस्ती, वाघोली) यास लोणीकंद पोलिसांनी दीड वर्षासाठी पुणे जिल्ह्यातुन तडीपार केले आहे.
परिमंडळ चारचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 (1) (अ) (ब) प्रमाणे पुणे जिल्ह्यातुन दीड वर्षाकरीता तडीपार केले आहे.
वाघोली, आव्हाळवाडी तसेच आसपासच्या भागात गावठी हातभट्टीची दारु विक्री करून या भागात राहणारे नागरिकांना वारंवार त्रास देऊन दहशत निर्माण करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणा-या सराईत गुन्हेगारांच्या कृत्यामुळे लोकांच्या मनात कायद्याविषयी संभ्रम होऊ नये.
तसेच कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने शामकांत सातव याच्यावर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख लोणीकंद पोलिसांनी तपासून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांना प्रस्ताव पाठविला असता त्यांनी पुणे जिल्ह्याचे हद्दीतून दीड वर्षाकरीता तडीपार केले आहे.





