David Warner Retirement : वॉर्नरच्या नावावर आहे एक खास विक्रम, सचिन तेंडुलकर-रोहित शर्माही आहेत खूप मागे…

David Warner Record In International Cricket : डेव्हिड वॉर्नरने शनिवारी(6 जानेवारी 2024) आपल्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी पाकिस्तानविरुद्ध सिडनीच्या सिडनी क्रिकेट मैदानावर खेळली. वॉर्नर हा क्रिकेट जगतातील महान सलामीवीरांपैकी एक आहे. सलामीला फलंदाजी करताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनं सलामीला फलंदाजी करताना सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. सलामीला शतक ठोकण्याच्या बाबतीत भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरही डेव्हिड वॉर्नरच्या मागे आहे.
सचिन तेंडुलकर हा क्रिकेट जगतातील महान सलामीवीरांपैकी एक आहे. याशिवाय सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्माचाही या यादीत समावेश आहे, पण तोही ऑस्ट्रेलियन फलंदाजापेक्षा खूप मागे आहे. कसोटीशिवाय वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. सलामीवीर म्हणून खेळताना वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 451 डावांमध्ये 49 शतके झळकावली आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे, ज्याने 342 डावांमध्ये 45 शतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके ठोकण्याचा पराक्रम करणारा सचिन हा फलंदाज आहे.
या यादीत आघाडीवर, वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ख्रिस गेल 42 शतकांसह तिसऱ्या, श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या 41 शतकांसह चौथ्या, भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन प्रत्येकी 40 शतकांसह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके करणारे फलंदाज..
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) : 49 शतके (451 डाव)
सचिन तेंडुलकर (भारत) : 45 शतके (342 डाव)
ख्रिस गेल (वेस्ट इंडीज) : 42 शतके (506 डाव)
सनथ जयसूर्या (श्रीलंका) : 41 शतके (563 डाव)
रोहित शर्मा (भारत) : 40 शतके (331 डाव)
मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया) : 40 शतके (340 डाव)
वॉर्नरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द…
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय कसोटी कारकीर्दीला पूर्णविराम दिला. त्याने या मालिकेनंतर निवृत्त होत असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. त्याने 12 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत 112 सामन्यांत 205 डाव खेळताना 8,786 धावा केल्या आहेत. त्यात 335 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच त्याने एकूण 26 शतके फटकावली असून त्यात 3 द्विशतकी खेळींचाही समावेश आहे. त्याने 37 अर्धशतकेही फटकावली आहेत.
AUS vs PAK Test Series : ऑस्ट्रेलियाचा पाकला 3-0 ने व्हाइटवॉश; कमिन्स ठरला मालिकेचा मानकरी…
तसेच डेव्हिड वॉर्नरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 161 एकदिवसीय आणि 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्याच्या 159 डावांमध्ये 6 हजाक 932 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 99 डावांमध्ये 2 हजार 894 धावा केल्या.





