रोनाल्डोने साकारला अनोखा विक्रम; पोर्तुगालकडून 200 सामने खेळणारा पहिलाच खेळाडू
Updated On:

लिस्बन -जागतिक स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने एक नवा विक्रम आपल्या नावावर जमा केला आहे. त्याने पोर्तुगालकडून 200 सामने खेळणारा पहिलाच फुटबॉलपटू होण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या कामगिरीची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली आहे.
परवा झालेल्या युरो 2024 सालच्या पात्रता स्पर्धेत आईसलॅंड विरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने हा विक्रम साकार केला. त्याच्या गोलच्या जोरावर पोर्तुगालने विजय मिळवला व युरो 2024 सालच्या स्पर्धेत पोर्तुगालचा प्रवेश निश्चित केला.
रोनाल्डोने पोर्तुगालकडून आतापर्यंत खेळलेल्या या 200 सामन्यांत 123 गोल केले आहेत तसेच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा मानही त्याने मिळवला आहे. पोर्तुगालने युरो पात्रता स्पर्धेत सलग सहाव्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्याची एकही संधी दिली नाही.





