बारामतीत रहदारीच्या रस्त्यावर उलटला ट्रक

Updated On:

जळोची- बारामती शहरातील बालक मंदिर शाळे समोर युरिया वाहतूक करणारा ट्रक( एम. डब्ल्यू. के ०६१३) चेंबरमध्ये रुतून उलटला. रुतून जाग्यावरच उलटल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. लोकवस्तीतीत सदर घटना घडल्याने रहिवासी घाबरून गेले आहेत.

बारामती शहरातील भिगवण चौकानजीक बालक मंदिर शाळेसमोर आज सकाळी दहाच्या सुमारास येथील एका गोडाऊनमध्ये युरिया उतरविण्यासाठी ट्रक आला होता. मात्र रस्त्यात मोडकळीस आलेल्या चेंबरमध्ये अवजड ट्रकचे चाक रुतले व चेंबर खचला. 

चेंबरमध्ये चाक रूतल्याने ट्रक एका बाजूला कलंडला अगदी काही फुटांवरच याठकाणी घरे आहेत. शिवाय या रस्त्यावरून मोठी रहदारी होत असते. ट्रकचे चाक रुतून जागेवरच कलंडल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. 

दरम्यान येथील रहिवासी गिरीश दळवी यांनी बारामती नगरपालिकेकडे नुकतीच येथील चेंबर खचून मोठा खड्डा पडल्याने तो दुरुस्त करण्यासाठी अर्ज  केला होता. पालिकेकडून तीन दिवसांपूर्वीच सदर चेंबरची डागडुजी करण्यात आली होती. 

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा