नेवासा : मांजरवाडी (ता.जुन्नर) जिल्हा पुणे येथील अवघ्या साडेतीन वर्ष वयाच्या लिखित मयूर पटवा या चिमुकल्याने चक्क 2 मिनीट आणि 25 सेकंदात त्याने 28 भारतीय राज्यांच्या “जिगसॉ पझल” ब्लॉक्सची ओळख करून देत वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये विश्वविक्रम करण्याचा मान मिळविला आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल नेवासा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते अब्दुल शेख यांनी विशेष अभिनंदन केले आहे. मांजरवाडी (ता.जुन्नर) जिल्हा पुणे येथे ६ जून २०२१ रोजी जन्मलेला लिखित मयूर पटवा हा केवळ नर्सरीमध्ये शिक्षण घेणारा अतिशय हुशार मुलगा असून अवघ्या २ मि.२५ सेकांदांमध्ये त्याने २८ भारतीय राज्यांच्या “जिगसॉ पझल” ब्लॉक्सची ओळख करून देत वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये विश्व विक्रम करण्याचा मानकरी ठरलेला आहे. त्याच्या विश्वविक्रमामुळे त्याच्यावर राज्यभरातून सर्वत्र कौतुकाची थाप पडत असून मांजरवाडी येथील प्रगतशील शेतकरी जयकुमार पटवा यांचा तो नातू आहे. त्याच्या या यशामध्ये आई सौ.पायल पटवा वडील मयुर पटवा व कुटूंबियांचे विशेष योगदान लाभलेले आहे. तसेच फोनिक्स वर्ल्डच्या संचालिका सौ.ध्वनी कपाडिया यांचे त्याला विशेष मार्गदर्शन मिळालेले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.