कॉंग्रेस नेते करण सिंह यांची सूचना
नवी दिल्ली – शर्यू नदीच्या काठावर उत्तर प्रदेश सरकार प्रभू श्रीरामाचा पुतळ् उभारणार आहे. त्या पुतळ्याच्याबरोबर माता सीतेचाही पुतळा उभारण्यात यावा अशी सूचना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते करण सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारला केली आहे.
केवळ मर्यादापुरुषोत्तमाचा (श्रीराम) पुतळा उभारण्यापेक्षा श्रीरामाबरोबर दृढपणे एकनिष्ठ राहणाऱ्या सीतेचाही पुतळा उभारण्यात यायला हवा. तसे केल्यामुळे सीतेला आतापर्यंत न मिळू शकलेला न्याय मिळू शकेल. सीतेने आपल्या पतीपेक्षाही अधिक संघर्ष केला होता. अनेक शतकांनंतर अयोध्या नगरीकडून सीतेबाबत न्याय व्हायला हवा, असे करण सिंह यांनी म्हटले आहे.
शरयू नदीच्या काठावर सीतेचही पुतळा उभारण्यासाठी रामाच्या पुतळ्याची उंची निम्म्याने कमी करण्यात यावी. एकट्या श्रीरामांचा उंचा पुतळा उभारण्याऐवजी श्रीराम आणि सीता यांचे एकत्रित कमी उंचीचे पुतळे उभारण्यात यावेत, असेही करण सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.