एक तारा निखळला.! जयंत सावरकरांच्या जाण्याने सुभोध भावे झाला भावुक; पोस्ट वाचून तुमचेही डोळे पाणावतील

मुंबई – मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ नेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. काल संध्याकाळपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. जयंत सावरकर यांचा मुलगा कौस्तुभ सावरकर यांनी ही माहिती दिली.
मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं त्यांनी मराठी, हिंदी मनोरंजन विश्वावर वेगळी छाप उमटवली होती. सावरकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन क्षेत्रातील विविध सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे.
अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट शेअर करत जयंत सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुबोध भावेने इंस्टाग्रामवर जयंत सावरकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, जयंत सावरकर यांचे निधन… एक एक तारा निखळला… मी- अण्णा मी एक कार्यक्रम करतोय त्यात मला “एकच प्याला ” मधील एक प्रवेश करायचा आहे, मी गडकरींच्या नाटकात कधीच काम केलं नाही.
View this post on Instagram
मला ती वाक्य कशी म्हणायची शिकवाल का? अण्णा- का नाही? अर्थात शिकवीन, आनंदाने! असं म्हणुन तुम्ही ठाण्यातून दादर ला येऊन प्रचंड उत्साहात माझी तालिम घेतली होती. संगीत नाटक ते आत्ताच आधुनिक नाटक इतक्या मोठ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार होता. एका तरुणाला लाजवेल अशा ऊर्जेनी तुम्ही शेवटपर्यंत कार्यरत होतात. अण्णा तुमच्या बरोबर मला थोडफार काम करता आलं हे माझं भाग्य. अण्णा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली..!!’ या आशयाची पोस्ट त्याने शेअर केली आहे.





