‘जी रहे द हम..’ मध्ये दिसला ‘सलमान-पूजा’चा रोमँटिक अंदाज; नवीन गाण्याचा टीझर आऊट !

मुंबई – हिंदी सिनेसृष्टीतील मेगा सुपरस्टार सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांची उत्सुकता आताच वाढवली आहे. अश्यातच आता या चित्रपटातील आणखी एका नवीन गाण्याचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. स्वतः अभिनेता सलमान खानने आपल्या सोशल मीडियावर आकाउंटवर गाण्याचा हा टिझर शेअर केला आहे.
Fall in Love with ‘Falling in Love’ ….#JeeRaheTheHum out tomorrow@hegdepooja @VenkyMama @farhad_samji @AmaalMallik @Musicshabbir @adityadevmusic @Ranju_Varghese @IamJagguBhai @bhumikachawlat @boxervijender #AbhimanyuSingh pic.twitter.com/hVGNuzAM7t
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 20, 2023
‘जी रहे द हम (फॉलिंग इन लव्ह)’ असं या नवीन गाण्याचं नाव असून, सध्या हा टिझर सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओ गाण्यात सलमान खान अभिनेत्री पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसत आहे. याशिवाय राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम हे देखील पडद्यावर दिसत आहेत. या गाण्यातही सलमान खानचा स्वॅग पाहायला मिळत आहे. गाण्यातील सलमानच्या डान्स मूव्ह्सही खूप वेगळ्या आहेत.
आज रिलीज झालेल्या ‘जी रहे द हम’ या गाण्याच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये आधीच खळबळ उडवून दिली आहे. आता सलमानचे चाहते पूर्ण व्हिडिओ गाण्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच्या रिलीज डेटबद्दल बोलायचे झाले तर, हे गाणे उद्या म्हणजेच 21 मार्च रोजी रिलीज होणार आहे.





