Andhra Pradesh : …अन् ‘तिच्या’ नशिबी खडकाळ रस्ताच; आजारी विद्यार्थिनीला पाठीवर घेऊन वॉर्डनचा ६ किलोमीटर पायी प्रवास
Andhra Pradesh : योग्य वेळी उपचार मिळाल्याने विद्यार्थिनीच्या प्रकृतीत सुधारणा

Andhra Pradesh : आदिवासी आश्रमशाळेच्या एका महिला वॉर्डनने गंभीर आजारी विद्यार्थिनीला पाठीवर घेऊन तब्बल 6 किलोमीटर पायी चालत रुग्णालयात पोहोचवले. त्यांच्या या धाडसी आणि माणुसकी जपणाऱ्या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
परंतु दुसरीकडे, आंध्र प्रदेशातील पर्वतीपुरम मन्यम जिल्ह्यातील या घटनेनंतर आदिवासी भागातील रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या दुरवस्थेचे गंभीर वास्तव समोर आले आहे.
वडापुट्टी गावात राहणारी भुवनेश्वरी ही आदिवासी कल्याण विभागाच्या भद्रागिरी कन्या आश्रमशाळेत सातवीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. काही काळापूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालं, त्यानंतर ती सध्या आपल्या काकांकडे राहून शिक्षण घेत आहे. सुट्ट्यांमध्ये घरी परतल्यानंतर तिला खूप ताप आला. आधी तिच्यावर कुरुपम येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, पण घरी परतल्यानंतर तिची प्रकृती पुन्हा बिघडली. (Andhra Pradesh)
गावापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही (Andhra Pradesh)
विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नातेवाईकांनी शाळा प्रशासनाला दिली. त्यानंतर आदिवासी कल्याण विभागाच्या अधिकारी रजनी यांनी आश्रमशाळेच्या वॉर्डन हेमा यांना तात्काळ गावात जाऊन विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले. वॉर्डन हेमा यांनी वेळ न घालवता गाव गाठलं, पण तिथे पोहोचल्यावर त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान उभं राहिलं. (Andhra Pradesh)
कारण गावापर्यंत जाण्यासाठी कोणताही रस्ता नव्हता. हा मार्ग इतका दुर्गम आणि खडकाळ होता की, तिथे वाहन तर दूरच, साधी सायकलही जाऊ शकत नव्हती. मात्र वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी विद्यार्थिनीला कापडाच्या सहाय्याने आपल्या पाठीवर सुरक्षित बांधले आणि जंगलातील खडकाळ वाटेने सुमारे 6 किलोमीटरचा पायी प्रवास सुरू करत तिला रुग्णालयात पोहोचवलं. या प्रवासात विद्यार्थिनीचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत होते. (Andhra Pradesh)
योग्य वेळी उपचार मिळाल्याने विद्यार्थिनीच्या प्रकृतीत सुधारणा (Andhra Pradesh)
योग्य वेळी उपचार मिळाल्याने आता विद्यार्थिनीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर वॉर्डन हेमा यांच्या धाडसाचे आणि सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निस्वार्थी कार्याची दखल घेत महिला व बालकल्याण मंत्री गुम्माडी संध्याराणी यांनी हेमाणी यांचा सत्कार करून त्यांच्या धाडसी वृत्तीचे कौतुक केले. Andhra Pradesh
मात्र एकीकडे महिला वॉर्डनच्या कार्याची कौतुक आहे, तर याद्वारे आधुनिक भारताचे गोडवे गाणाऱ्या प्रशासनाची पोलखोल झाली आहे. यातून दुर्गम आदिवासी भागातील रस्ते, वाहतूक आणि आरोग्य सुविधांची कमतरता प्रकर्षाने समोर आली आहे. (Andhra Pradesh)
हेही वाचा :





