satara | वाढेफाटा ते बॉम्बे रेस्टॉरंट दरम्यान रस्त्याचा भाग नाल्यात कोसळला

कृष्णानगर, (प्रतिनिधी) – पावसाळा सुरू होऊन देखील नॅशनल हायवे अथॉरीटी ऑफ इंडियाने कोणतीच काळजी न घेतल्याने वाहनचालकांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
खेड विभागातील वाढेफाटा ते बॉम्बे रेस्टॉरंट या सर्विस रोडवर वसंतनगर येथे रस्त्याचा भाग नाल्यात कोसळला असून सदर भाग हा वाहनचालकांच्या दृष्टीने धोकादायक झाला आहे. त्याची लवकरात लवकर डागडुजी करणे अत्यंत गरजेचे आहे.
अखंड भारतात उत्कृष्ट क्रॉकीट रस्त्याचे जाळे विणले जात असताना पुणे-बंगळूरू महामार्गावरील पुणे-सातारा रोड हा कायम चर्चेत राहिला असून सर्विसरोड सुध्दा यातून सुटला नाही.
अनेक ठिकाणी खडडे तसेच सर्विस रोडवरील पाण्याचा निचरा न होणे गटारातील पाणी रोडवर येणे अशा अनेक समस्यांना वाहनचालकांना रोड टक्स देवून सुद्धा अशा समस्यांना तोंड द्यावे लागते याचाच प्रत्यय सातारा येत आहे.
यासंदर्भात हायवे अॅथोरिटी अधिकारी गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.
भरमसाट रोड कर व टोल देऊनसुद्धा वाहनचालकांना पदरी निराशाच पडत असून प्रशासन व लोक प्रतिनिधी या बाबतीत कोणतेच लक्ष घालताना दिसून येत नाही याबद्दल नागरिकामध्ये नाराजीचा सूर आहे.





