Actress Prajakta Gaikwad : प्राजक्ताचा चाहत्यांना सुखद धक्का! ‘ठरलं’ असल्याची दिली गुडन्यूज; पण जोडीदाराच नाव गुलदस्त्यात…कोण आहे तो?

Actress Prajakta Gaikwad : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ताचं ठरलं असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर प्राजक्ताचं ठरलं असून तिने ही गूडन्यूज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत दिली आहे. यामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
प्राजक्ताने इन्स्टाग्रावर सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पारंपारिक लूकमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने जून महिन्यातच लग्नाची हिंट दिली होती. पिवळ्या रंगाच्या साडीत सुंदर फोटो शेअर करत त्याला हटके कॅप्शन दिलं होतं. तसेच ‘पाहुणे मंडळी’ हा हॅशटॅग देखील वापरला होता. त्यामुळे ती लग्न करणार लग्नबंधनात अडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. आता अखेर प्राजक्ताचं ठरलं असल्यावर शिक्कामोर्तेब झाला आहे.
View this post on Instagram
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुंदर साडी नेसून गळ्यात फुलांचा सुंदर हार, हातात चुडा, नाकात नथ, केसात गजरा असा पारंपरिक लूक प्राजक्ताने परिधान केला आहे. या लूकमध्ये तिचं सौंदर्यं अधिक खुलून दिसत आहे. हे फोटो लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोंना, “प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा…#ठरलं” असं कॅप्शन प्राजक्ताने दिलं आहे. या फोटोंवर चाहत्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.





