“काळजाचा तुकडा हिरावला….” शेफालीच्या शोक सभेत पित्याला अश्रू अनावर; परागने दिला धीर, व्हिडीओ पाहा

Shefali Jariwala : ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जारीवालाच्या निधनाला आज आठवडा पूर्ण झाला आहे. २७ जूनच्या रात्री उशिरा तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. तिच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शेफालीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून त्यांना बाहेर पडण्यासाठी शेफालीच्या मित्रपरिवाराकडून प्रार्थना केली जात आहे.
बुधवारी शेफालीच्या जारीवालीसाठी शोक सभा आयोजित करण्यात आली होती. या शोक सभेत शेफालीच्या वडिलांना आपल्या मुलीच्या आठवणींत रडू कोसळलं. यावेळी शेफालीचा पती परागने त्यांना धीर दिला. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बुधवारी मुंबईत शेफालीसाठी शोक सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेत वातावरण खूप भावनिक झाले होते. पण यावेळी हृदयाला सर्वात जास्त स्पर्श करणारे दृश्य म्हणजे तिचे वडील असह्यपणे रडत होते आणि शेफालीचा पती पराग त्यागी त्यांना धीर देत होता. या कठीण काळात त्यांचा जावई आणि शेफालीचे पती पराग त्यागी कुटुंबाला यातून सावरण्यासाठी धीर देत आहे. पत्नीच्या निधनाने पराग स्वतः खूप दुःखी आहे. मात्र, यातूनही तो कुटुंबाचा आधार बनला आहे.
View this post on Instagram
कांटा लगा गर्ल आणि बिग बॅास १३ या शोच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जारीवाली हिचे २७ जून रोजी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिचे निधन हृदय विकाराच्या झटक्याने झाले असल्याचे सांगितले जात आहे. अद्यापर्यंत तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय याची माहिती समोर आलेली नाही. वयाच्या अवघ्या ४२ वर्षी शेफालने जगाचा निरोप घेतल्याने तिच्या कुटुंबीयांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा : “कोट्यावधीशांचे कर्ज माफ, पण शेतकरी दुर्लक्षितच”; महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याबाबत राहुल गांधींचे ट्वीट





