आमदाराचा एक फोन आणि एकनाथ शिंदे मदतीला धावले; स्वत: विमानतळावर दाखल…
Eknath Shinde | शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांच्या आई वत्सलाबाई बांगर यांच्या हृदयात ब्लॉकेजेस असल्याने त्यांची तब्येत काल अचानक खालावली. त्यामुळे हिंगोली येथील डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी मुंबईला नेण्यास सांगितले. याबाबत बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील तत्परता दाखवत आमदार बांगर यांच्या मातोश्रीसाठी विशेष एअर अँब्युलन्स नांदेडला पाठवली. या एअर अँब्युलन्समध्ये बसून आमदार बांगर आणि त्यांच्या मातोश्री मुंबई विमानतळावर पोहोचले. इतकेच काय तर, मुंबई विमानतळावर स्वत: एकनाथ शिंदे यांनी बांगर यांच्या मातोश्रीच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना तत्काळ मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. Eknath Shinde |
माझ्या आईला तीन ब्लॉकेजेस निघाले.. तातडीने पुढील उपचारासाठी मुंबईला जाण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री @mieknathshinde यांनी #air_ambulance पाठवली.. स्वतः विमानतळावर येऊन आईच्या तब्येतीची विचारपूस करून धीर दिला..
मनापासून धन्यवाद साहेब. pic.twitter.com/otrX8Lx8AW— आमदार संतोष बांगर (@santoshbangar_) August 24, 2025
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ एअर अँब्युलन्स उपलब्ध करून दिल्याने बांगर यांनी त्यांचे आभार मानले. आमदार बांगर म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्यामुळे माझ्या आईचे प्राण वाचले. मी त्यांचा आभारी आहे.” तसेच विमानतळवरील एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ शेअर करत ‘नेता असावा तर असा’ म्हंटले आहे. Eknath Shinde |
हेही वाचा:
राजगुरुनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; वकिलासह अनेक जण जखमी, नागरिकांमध्ये घबराट





