Parbhani News : परभणीत भांडण पाहण्यासाठी गेलेल्या एकावर कोयत्याने वार
Updated On:

परभणी – शहरातील खानापूर फाट्याजवळील हॉटेलवर झालेले भांडण पाहण्यासाठी गेलेल्या एकावर कोयता, चाकूने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी 8 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास खानापूर फाटा भागातील कृष्णा हॉटेलजवळ घडली. ज्ञानोबा मोहिते यांनी तक्रार दिली आहे.
फिर्यादी हे हॉटेलवर नातेवाइकांसोबत बसले होते. या वेळी त्यांच्या चुलत भावाच्या हॉटेलवर वाद झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे फिर्यादी त्या ठिकाणी गेले. त्यावेळी संशयितांनी ज्ञानोबा मोहिते यांच्यावर कोयत्याने वार केले.
तसेच चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. जखमी मोहिते यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.





