पुणे : मल्हार मार्तंडाची जेजुरी नगरीत यात्रेकरू भाविकांना वाहन पार्किंग करण्यासाठी पार्किंग तळ उभारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप दिलीपभाई बारभाई यांनी दिली. जेजुरी नगरपालिकेकडील असलेल्या जागा अधिकृत करून त्यावर दोन ते तीन मजली वाहन तळ उभारण्याची योजना पुणे शहराच्या धर्तीवर जेजुरी शहरात पार्किंग सुविधा उपलब्ध करणार आहे. जेजुरी शहरात यात्रेकरू भाविकांच्या गाड्या रस्त्यावर पार्किंग झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. जेजुरीच्या पर्यटनाबरोबर अर्थकारणाला एकप्रकारे गती मिळण्यास मदत होईल. यात्रेकरूनी वाहने सुस्थितीत ठेवण्यासाठी मदत होईल. जेजुरी नगरपरिषदेचे माध्यमातून जेजूरीवासियांना सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आम्हाला सर्व दहाही प्रभागामधून मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळत आहे. आगामी काळात जेजुरी शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले.