‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात नवा ट्वीस्ट; स्पर्धकांना दिला फोन…

Bigg Boss OTT Season | ‘बिग बॉस ओटीटी’चे तिसरे पर्व आता प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. अनेकजण या शोची प्रतिक्षा करत होते. अखेर हा शो सुरू झाला असून यंदा हा शो अभिनेता अनिल कपूर होस्ट करत असल्याचे दिसत आहे. याआधी करण जोहर आणि सलमान खानने हा शो होस्ट केला आहे. त्यानंतर या शोला नवा होस्ट मिळाल्यानंतर यातील काही नियमांमध्ये देखील बदल करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील स्पर्धकांना पर्सनल फोन वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात टेलिफोन येणार आहेत. बिग बॉसने सांगितले की, हा फोन प्रत्येकाला मिळणार नाही तर फक्त एकालाच मिळेल जो लोकांचा एजंट असेल. हा सदस्य बिग बॉससाठी, अनिल कपूरसाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी खेळणार नाही. तर हा लोकांचा एजंट असेल.
बिग बॉस’ने सर्व स्पर्धकांना एक-एक करून कन्फेशन रूममध्ये बोलावले आणि त्यांना मोबाईल फोन दिला. याद्वारे तो इतर स्पर्धकांशी बोलू शकणार आहे आणि बिग बॉसचे मेसेज प्राप्त करू शकणार आहे.
यंदाच्या पर्वात एकूण १६ स्पर्धक आहेत. ज्यामधील १५ जणांना ‘बिग बॉस’ने घरातले आणि एकाला बाहेरचा म्हणून घोषित केलं आहे. ‘बिग बॉस’ने सना सुलतानला ही संधी दिली आहे. म्हणजे हा एक सदस्य बाहेरील गोष्टी घरातल्या सदस्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. Bigg Boss OTT Season |
सलमान खानच्या जागी अनिल कपूर दिसत आहे. याशिवाय नियमांमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. फोन आणि एजंट नुकतेच जोडले गेले आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात सना सुलतान, चंद्रिका दीक्षित, सना मकबूल, पौलोमी दास, विशाल पांडे, दीपक चौरसिया, साई केतक राव, नीरज गोयत, पायल मलिक, कृतिका मलिक, शिवानी कुमारी, लव कटारिया, नेझी, मुनिषा खटवानी, अरमान मलिक आणि रणवीर शौरी हे स्पर्धक आहेत. Bigg Boss OTT Season |
हेही वाचा:
‘गुजरात सरकार माझा छळ करतंय…’ ; TMC खासदार युसूफ पठाण यांचा आरोप ; उच्च न्यायालयात धाव





