पुणे – हाऊस ऑफ पीएनजीच्या कंटेम्प्रेरी लाईफस्टाईल ब्रँड लाइटस्टाईल बाइ पीएनजीने पुण्यातील विमाननगर येथील आयडियल लँडमार्क कॉम्प्लेक्समध्ये आपल्या नवीन स्वतंत्र दालनाचे उद्घाटन केले आहे. हे दालन हलकी, स्टायलिश आणि ठळक डिझाईन असलेल्या दागिन्यांची पसंती असलेल्या फॅशनप्रेमी ग्राहकांसाठी खास सुरू करण्यात आले आहे. 600 चौ. फूट क्षेत्रफळ असलेले हे विमाननगर मधील दालन पुण्यातील लाइटस्टाईलचे चौथे तर एकूण भारतभर पाचवे स्टोअर असून, यामुळे पीएनजी ज्वेलर्सच्या विविध फॉरमॅट्समधील स्टोअर्सची एकूण संख्या 66 वर पोहोचली आहे. या स्टोअरचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्टोअरमध्ये 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्यातील दागिन्यांसह 18 कॅरेट डायमंड ज्वेलरीचा विस्तृत संग्रह उपलब्ध आहे. समकालीन डिझाईन, परवडणारी किंमत आणि प्रीमियम रिटेल अनुभव यांवर लक्ष केंद्रित करत, लाइटस्टाईल ब्रँड शहरी ग्राहकांमध्ये आपली वेगळी ओळख अधिक मजबूत करत आहे. लाइटस्टाईलचे हेड-मार्केटिंग, ई-कॉमर्स, सीआरएम आणि सीएसआर, हेमंत चव्हाण म्हणाले, विमाननगरमध्ये तरुण, शहरी ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, जे हलक्या दागिन्यांकडे अधिक आकर्षित होत आहे. हा नवीन रिटेल टचपॉईंट आम्हाला या ग्राहकांशी अधिक जोडण्यास मदत करेल. लाइटस्टाईलच्या विस्तार योजनांबाबत बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, ग्राहकांच्या बदलत्या आवडी लक्षात घेऊन हलक्या आणि फाइन ज्वेलरीमध्ये नावीन्य आणणे ही लाइटस्टाईलची संकल्पना आहे.