अहमदनगर – वांबोरीत काॅलेज तरुणाकडून एकास बेदम मारहाण

राहुरी – तालुक्यातील वांबोरी येथे काॅलेज तरुणांचे दोन गट समोरासमोर आले. मागील भांडणाच्या कारणावरुन एका गटाने संकेत पटारे या तरुणाला दगड, फायटरने मारहाण करून जखमी केले.संकेत संजय पठारे (रा. वांबोरी (ढवळेवस्ती) ता. राहुरी) या काॅलेज तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
संकेत पठारे हा तरुण वांबोरी येथील कन्या माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत आहे. दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वा. चे सुमारास संकेत पठारे हा कॉलेजच्या जेवणाची सुट्टी झाल्याने त्याच्या मित्रांबरोबर गेटवर उभा होता. तेव्हा आरोपी तेथे आले. तुम्ही दोन चार दिवसांपूर्वी आमच्याशी वाद का घातला, असे म्हणून शिवीगाळ करू लागले.
तेव्हा संकेत पठारे त्यांना म्हणाला की, तुम्ही शिवीगाळ का करता. काचोळे म्हणाला की, तुझ्या वर्गातील मुलांसोबत माझे भांडण झाले. तेव्हा तू माझे सोबत त्या मुलांना का मारू लागला नाही. असे म्हणुन बाटली डोक्यात मारली. दगड, फायटर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत संकेत पठारे हा जखमी झाला. त्याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी संकेत अरुण काचोळे, पृथ्वीराज निवृत्ती नन्नवरे , वैभव अनिल कल्हापुरे, ओंकार देवकर, वैभव संजय हरिश्चंद्रे , अक्षय शिरपुर, (सर्व रा. खंडाबे खु). मंगेश मिसाळ (राहुरी) , गौरव हंडाळ , ओमकार पेरणे ( रा. तांदुळवाडी, ता. राहुरी) या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.





