पुणे जिल्हा | शिक्रापुरात टोळक्याकडून एकास बेदम मारहाण

शिक्रापूर, (वार्ताहर)- येथील जकातेवस्ती येथे गाडी हलू चालवा म्हटल्याच्या कारणातून दहा जणांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अमोल संभाजी पलांडे (वय 32, रा. मुखई) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी प्रसाद सासवडे याच्यासह अनोळखी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जकातेवस्ती येथे अमोल पलांडे हे त्याच्या दुचाकीवर उभे असताना अचानक दोन दुचाकीहून सहा युवक भरधाव वेगाने आले.
यावेळी पलांडे यांनी या युवकांना दुचाकी हळू चालवा असे म्हटल्याने युवकांनी अजून काही मित्रांना बोलावून घेत अमोल पलांडे यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच काही युवकांनी फायटर व दगडाने मारहाण करत जखमी केले. यावेळी झालेल्या मारहाणीत पलांडे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व घड्याळ देखील गहाळ झाले.




