नागपूरमध्ये दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट; दोघांचा मृत्यू
Updated On:

नागपूर : नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील डोरली गावाजवळील एका दारुगोळा निर्मिती कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला असून, घटनास्थळी भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागपूरमध्ये दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीत दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्फोटाच्या वेळी काही कामगार कंपनीत कार्यरत होते, तर काहीजण बाहेर होते. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आल्याने स्थानिक नागरिक घाबरले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती समोर आली नाही.


