राष्ट्रवादीला मोठे खिंडार! प्रभाग ३ मधील तापकीर दांपत्य आता भाजपाच्या गोटात

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 3 मधील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका विनया तापकीर आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला.विशेष म्हणजे, आमदार महेश लांडगे देतील त्या उमेदवारांचे काम आम्ही करणार आहोत.
चऱ्होलीच्या विकासात योगदान आम्ही दिले असून, आगामी काळात आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात आणखी विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास माजी नगरसेविका विनया तापकीर यांनी व्यक्त केला आहे. पिंपरी-चिंचवड भाजपा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे तापकीर दांम्पत्याचा जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे आणि माजी नगरसेवक उल्हास शेट्टी उपस्थित होते.पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मोशी गावठाण, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर भाग, साई मंदिर परिसर,
गोखले मळा, अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारेमळा, ताजणेमळा, चोवीसावाडी चहोली, डुडुळगाव या परिसरात आणि प्रभाग क्रमांक 4 मधील काही भागात तापकीर दांपत्याचा चांगला जनसंपर्क आहे.





