गव्हाच्या दाण्यांनी साकारले अटलबिहारी वाजपेयी यांचे भव्य चित्र
Updated On:

पुणे – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज ९६ व्या जयंती आहे. यानिमित्त वाजपेयी यांचे भव्य चित्र गव्हाच्या दाण्यांनी साकारण्यात आले आहे. सदाशिव पेठेतील निनाद पुणे आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे चित्रयज्ञ २०२० अंतर्गत वाजपेयींना खास अभिवादन करण्यात आले. तसेच सुमारे १०० किलो गहू वंचित विकास या संस्थेस देण्यात येणार आहे.





