इमरान खानने बांधला आलिशान व्हिला; निसर्गाच्या सानिध्यायातील या खास घराची दाखवली झलक

Imran Khan Villa| अभिनेता इमरान खान सध्या चित्रपट सृष्टीपासून लांब आहे. पण सोशल मीडियावर तो सक्रिय आहे. त्याने नवीन घर खरेदी केले आहे. या घराची झलक दाखवत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. निसर्गाच्या सानिध्यात त्याने हे नवं घर बांधले आहे. मात्र हे घर बांधण्यासाठी त्याच्याकडे पैसे कोठून आले? असा प्रश्न एका नेटकऱ्याने त्याला विचारला. त्यावर इमरानने देखील सडेतोड उत्तर दिले आहे.
घराचे फोटो शेअर करत इमरानने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ गेल्या काही वर्षात मी जे काम केलं. त्यापैकी एक म्हणजे घर बांधणे. खरंतर मी काही चित्रपटांमध्ये एक आर्किटेक्चरची भूमिका साकारली होती. पण खऱ्या आयुष्यात कोणतीही ट्रेनिंग किंवा एक्सपर्ट असल्याचा दिखावा मी करु शकत नाही. पण मला गोष्टी बनवायला आणि शिकायला खूप आवडते. मी ही साईट निवडली कारण ही खूप सुंदर आहे.”
“दोन नद्या आणि डोंगर या सगळ्याच्या अगदी खाली ही जागा आहे आणि अगदी समोरच सुर्यास्त होतो. लॅन्डस्केपनुसार घराला डिझाइन करणं योग्य असेल, असे मला जाणवले. माझे प्रयत्न हे एक आलिशान हॉलिडे व्हिला बनवनं नव्हतं, तर असं काही बनवायचं होतं जे लॅन्डस्केपनं प्रेरित असेल. घराचा अर्थ फक्त व्ह्यू असनं नाही, हे एक आश्रम आहे जिथून तुम्ही निसर्गाचं सौंदर्य पाहून त्याची स्तुती करू शकता.” Imran Khan Villa|
View this post on Instagram
इमराननं घर बनवण्यासाठी कशी तयारी केली याबाबातही सांगितले. “पहिल्या वर्षी मी सूर्योदय आणि सुर्यास्त, पाऊस येतो तेव्हा झऱ्याचा प्रवाह कसा आणि त्यासोबत जसे ऋतू बदलतात तसे काय बदल होतात हे पाहण्यासाठी वेळ दिला, जेणे करून मला त्या पद्धतीनं घर डिझाइन करणं सोप होऊ शकतं. माझ्या कंत्राटदाराशी आणि स्ट्रक्चरल इंजिनीअरशी या बाबतीत चर्चा केल्यानंतर मी काँक्रीट स्लॅब बांधण्याचा निर्णय सोडून दिला. त्याऐवजी क्लासिक पद्धतीचा अवलंब केला,” असे इमरान म्हणाला. Imran Khan Villa|
त्याच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने ‘एवढं पैसे कुठून मिळतात?’ असा सवाल केला. त्यावर इमरानने देखील ‘मी काही चित्रपटांमध्ये काम केले आहे’ असे उत्तर देतो. तर काहींनी त्याच्या या नव्या घराबाबत शुभेच्छा देत त्याचे कौतुक केले आहे.Imran Khan Villa|
हेही वाचा:





