भयंकर…! नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर चार महिन्यांपासून अत्याचार

सांगली : सांगलीतील जत तालुक्यातून मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. १३ वर्षांच्या लेकीवर बापानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या नराधम बापावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत रात्री उशिरा उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुलीच्या असाहाय्यतेचा फायदा घेत जन्मदात्या बापानेच तिच्यावर अत्याचार केले. चार महिने हा प्रकार सुरू होता. ही घटना लक्षात येताच मुलीच्या आईने पतीला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु तो ऐकत नव्हता. अखेरीस शुक्रवारी सकाळी तिने उमदी पोलिस ठाण्यात धाव घेऊन महिला अंमलदारांना याबाबतची माहिती दिली
याबाबत उमदी पोलिसांनी तातडीने नराधम बापास अटक केली असून त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मुलीवरच बापाकडून गेल्या चार महिन्यापासून वारंवार लैंगिक अत्याचार होत असल्याची घटना घडल्यामुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी पीडितेसह तिच्या आईचा जबाब नोंदविला आहे. यावेळी पीडित मुलीने अधिकाऱ्यांसमोर बापाच्या अत्याचाराबाबत माहिती दिली. या अत्यंत गंभीर घटनेची तत्काळ दखल घेत उमदी पोलिसांनी नराधम बापास ताब्यात घेतले. मात्र केलेल्या या निर्दयी कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर लवलेशही नव्हता. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
१२ वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचार
अल्पवयीन १२ वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय भागवत कुंडलकर (वय ३६, रा. म्हाडा कॉलनी, शहापूर) याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, संतप्त महिलांनी न्यायालयासमोर हातात चप्पल घेऊन आंदोलन केले.





