FIFA Final Fight : फिफाच्या फायनलनंतर मैदानावर हाय-व्होल्टेज ड्रामा! अर्जेंटिना-स्पेनच्या खेळाडूंमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल
Fifa Final Clash : अंतिम सामन्याची अंतिम शिट्टी वाजताच विजेत्या स्पेन आणि पराभूत अर्जेंटिनाच्या खेळाडूंमध्ये अचानक जोरदार शाब्दिक चकमक उडाली

FIFA World Cup 2026 Final Argentina vs Spain Fight Video Viral : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ च्या थरारक अंतिम सामन्यानंतर न्यू जर्सी येथील मेटलाईफ स्टेडियमवर एक अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंतिम सामन्याची अंतिम शिट्टी वाजताच विजेत्या स्पेन आणि पराभूत अर्जेंटिनाच्या खेळाडूंमध्ये अचानक जोरदार शाब्दिक चकमक उडाली. काही क्षणांतच हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही संघांचे खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ थेट एकमेकांच्या अंगावर धावून आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मैदानावर धक्काबुक्की अन् राडा; व्हिडीओ व्हायरल –
सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांतील खेळाडू अत्यंत आक्रमकपणे एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. वाद हाताबाहेर जाऊ नये म्हणून मुख्य प्रशिक्षक, सुरक्षा कर्मचारी आणि फिफा अधिकाऱ्यांना तातडीने मैदानात धाव घेऊन मध्यस्थी करावी लागली. काही आक्रमक खेळाडूंना सहकाऱ्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी बळजबरीने मागे ओढून शांत करण्याचा प्रयत्न केला.
Argentinian and Spanish players brawl after the final whistle of the World Cup pic.twitter.com/5azyFDJOC3
— Chay Bowes (@BowesChay) July 20, 2026
A brawl erupted after the final whistle of the World Cup final when Argentina midfielder Leandro Paredes shoved Spain’s Gavi to the ground as substitutes rushed onto the pitch to celebrate their 1-0 win. pic.twitter.com/S6b60snnZB
— AJE Sport (@AJE_Sport) July 20, 2026
वादाचे नेमके कारण काय?
🚨 Post-World Cup Final Brawl!
Paredes goes full Mike Tyson mode after Argentina’s loss — throws haymakers at Gavi, sparks chaos.
Red card issued. 😤🥊#WorldCupFinal #fifadünyakupası pic.twitter.com/T3NCyme4uw
— Public News X (@PublicNewsX) July 19, 2026
सामन्यानंतर मैदानावर निर्माण झालेल्या या तणावपूर्ण परिस्थितीचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, सामन्यादरम्यान झालेले आक्रमक टॅकल्स, खेळाडूंचे दुखावलेली मनं आणि अंतिम निकालामुळे निर्माण झालेल्या दबावातून हा वाद उफाळून आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विश्वचषकासारख्या जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेच्या फायनलमध्ये अशा प्रकारे खेळाडू भिडल्याने क्रीडा जगतातून तीव्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
फिफा कडक कारवाई करणार?
The Fifa World Cup final will be remembered forever for this.
Did football really won seeing the fight between players? pic.twitter.com/5qC3gHQBTa
— CryptoBudhha ❤️ $DOG (@CryptoBudhha) July 20, 2026
या घटनेनंतर आता फिफा (FIFA) शिस्तपालन समिती या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेणार का, तसेच व्हायरल व्हिडिओच्या आधारे दोषी खेळाडूंवर शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई केली जाणार का, याकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.





