आजोबाच्या मृतदेहावर नातू, काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचे हृदय हेलावणारे दृश्य

श्रीनगर – जम्मू-काश्मीर येथील सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे तर तीन जण जखमी आहेत. आणि एक नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. मात्र या दहशतवादी हल्ल्यातील हृदय हेलावणारे दृश्य दिसले.
सोपेरा येथील दहशतवादी हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला. मात्र, त्या नागरिकाचा चिमुकला नातू आपल्या आजोबाच्या मृतदेहावर बसून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होता. हा नागरिक 60 वर्षाचा वृद्ध होता. जमिनीवर मृतदेह पडला हे पाहून तो चिमुकला रडत होता. हे पाहून बाजूला अतिरेक्यांवर निशाणा धरुन बसलेला भारताचा जवानाने त्या चिमुकल्याला आपल्याकडे बोलावून घेतले. आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
#WATCH Jammu & Kashmir Police console a 3-year-old child after they rescued him during a terrorist attack in Sopore, take him to his mother. The child was sitting beside his dead relative during the attack. pic.twitter.com/znuGKizACh
— ANI (@ANI) July 1, 2020
दरम्यान, सोपोरमध्ये निगराणी करणाऱ्या सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. भारतीय जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये चार जवान आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोन जवानांची प्रकृती गंभीर आहे.





