हृदय पिळवटून टाकणारी घटना.. पुण्यात शववाहिनीचा चालक नसल्याने कुटुंबाला मृतदेह रिक्षातून नेण्याची आली वेळ
Updated On:

पुण्यातील कॅन्टोन्मेंटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शववाहिनी उपलब्ध नसल्याने वृद्धेचा मृतदेह थेट रिक्षातून नेण्याची गंभीर बाब नातेवाईकांवर आली आहे. सोमवारी रात्री १० च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
वृद्ध आजी रुक्मिणी मोहिते (वय ९५ ) यांचे सोमवारी रात्री १० च्या सुमारास निधन झाले होते. त्यामुळे, आजीचा मृतदेह नवा मोदीखाना कॅम्प येथून केवळ ५०० मिटर अंतरावर असलेल्या पटेल रुग्णालयात शवागारमध्ये ठेवण्यासाठी जायचे होते. त्यामुळे, नातेवाईकांनी बोर्डाच्या धोबी घाट येथील वाहनतळ गाटले. मात्र त्याठिकाणी शववाहीनी चालवण्यासाठी चालकाच रात्री उपलब्ध नसल्याचे भयंकर प्रकार समोर आला





