Satara : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज भरगच्च कार्यक्रम

सातारा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त नायगाव (ता खंडाळा) येथील जन्मस्थळी शुक्रवारी (दि. ३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रीगण व मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई जयंती उत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जयंती सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवर अभिवादन करणार आहेत. यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पणकरुन ते शिल्पसृष्टीची पाहणी करणार आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार नितीन पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार धैर्यशील मोहिते -पाटील, आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. जयंत आसगावकर, आ. अरुण लाड, आ. शशिकांत शिंदे, आ. छगन भुजबळ, आ. राहुल कुल, आ. अतुल भोसले, आ. सचिन पाटील, आ. मनोज घोरपडे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील , पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त सकाळी ८ वाजता सावित्रीबाई दिंडी सोहळा , ९ वाजता कवयित्री संमेलन व सकाळी ११ वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन, शिल्पसृष्टी पाहणी, सावित्रीबाई फुले यंच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करणे, स्वयंसहाय्यता समूह उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन, मान्यवरांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन व इ भूमीपूजन, बक्षीस वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नगारजन, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, नायगावच्या सरपंच सौ. स्वाती जमदाडे यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





