‘विकी विद्या का वो व्हिडिओ’ चित्रपटात दिसणार राजकुमार राव – तृप्ती डिमरीची केमेस्ट्री

Entertainment । राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांचा आगामी चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाची कथा ९० च्या दशकातील एका नवविवाहित जोडप्यावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये नवविवाहित विकी आणि विद्या यांनी त्यांच्या लग्नाच्या रात्रीचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे दाखवण्यात आले होते, ज्याची सीडी कुठेतरी चोरीला गेली.
पोलिस निरीक्षक विजय राज या सीडीची चौकशी सुरू करतो , जो प्रकरण सोडवताना मल्लिका शेरावतच्या प्रेमात पडतो. 3.5 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये शहनाज गिल आणि दलेर मेहंदीची झलक राजकुमार आणि तृप्तीशिवाय विजय राज, मल्लिका शेरावत आणि टिकू तलसानिया यांसारखे कलाकार दिसत आहेत. याशिवाय शहनाज गिल आणि दलेर मेहंदी देखील चित्रपटातील गाण्यांमध्ये स्पेशल अपिअरन्स देताना दिसणार आहे.
या चित्रपट आलिया स्टारर ‘जिगरा’सोबत टक्कर होणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ‘ड्रीमगर्ल’ फेम दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी केले आहे. 11 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर आलिया भट्ट आणि वेदांग रैना स्टारर ‘जिगरा’सोबत होणार आहे.
वर्क फ्रंटवर, राजकुमारचा मागील चित्रपट ‘स्त्री 2’ ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. तृप्ती ‘बॅड न्यूज’मध्ये विकी कौशल आणि एमी विर्कसोबत दिसली होती.





