India A Squad : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर; रिंकू सिंगला मिळाली मोठी जबाबदारी
India A Squad : रायझिंग स्टार्स आशिया कपसाठी भारत 'अ' संघात बदल करण्यात आले आहेत. रजत पाटीदारने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी आयुष बदोनीला संघात स्थान देण्यात आले आहे.

Rising Stars Asia Cup 2026 India A Squad Changes : आगामी बहुचर्चित रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय ‘अ’ संघात बीसीसीआयने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मध्यफळीतील भरवशाचा फलंदाज रजत पाटीदार दुखापतीमुळे ५० षटकांच्या फॉरमॅटसाठी वेळेत तंदुरुस्त होऊ शकला नाही. त्याने स्वतःहून अनुपलब्धता दर्शवल्याने त्याला संघातून वगळण्यात आले आहे. पाटीदारच्या जागी आक्रमक फलंदाज आयुष बदोनीला संघात संधी देण्यात आली आहे. या मोठ्या बदलानंतर टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पाटीदार दुखापतीतून सावरण्यात व्यस्त; आयुष बदोनीची थेट एन्ट्री
बीसीसीआयने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, रजत पाटीदार सध्या आपल्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी रिहॅबिलिटेशनवर लक्ष केंद्रित करत आहे. ५० षटकांच्या सामन्यांमधील शारीरिक ताण पाहता त्याने सध्या या फॉरमॅटमधून माघार घेतली आहे. त्यामुळे निवड समितीने तातडीने निर्णय घेत दिल्लीच्या आयुष बदोनीला संघात स्थान दिले आहे. बदोनीने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये दाखवलेली सातत्यपूर्ण फटकेबाजी पाहता तो मधल्या फळीत पाटीदारची उणीव भरून काढण्यासाठी सज्ज आहे.
तिलक वर्मा कर्णधार; रिंकू सिंगकडे उपकर्णधारपदाची कमान
🚨 India A Rising Stars Asia Cup Squad Update 🚨
Rajat Patidar has communicated to the BCCI that he should not be considered for selection in the 50-over format as he manages his existing injuries.
📌Rinku Singh named new vice-captain
📌 Ayush Badoni replaces Patidar.More details 🔽
https://t.co/lYEM3nsBIa
— BCCI (@BCCI) November 8, 2026
या स्पर्धेत भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व युवा स्टार फलंदाज तिलक वर्मा करणार आहे. तर उपकर्णधारपदी बदल करत बीसीसीआयने रिंकू सिंगवर विश्वास दाखवला आहे. या संघात अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी यांसारखे आक्रमक फलंदाज उपस्थित आहेत. यष्टीरक्षणाची धुरा प्रभसिमरन सिंग आणि कुमार कुशाग्र यांच्यावर सोपवण्यात आली आहे. गोलंदाजी विभागाची भिस्त हर्षित राणा, प्रिन्स यादव आणि अर्शद खान यांच्या वेगवान माऱ्यावर असणार आहे.
२० नोव्हेंबरला नेपाळविरुद्ध पहिली लढत; २२ ला पाकिस्तानशी टक्कर
भारतीय ‘अ’ संघ आपल्या मोहिमेची सुरुवात २० नोव्हेंबर रोजी नेपाळ ‘अ’ विरुद्ध वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर करणार आहे. यानंतर २२ नोव्हेंबरला याच मैदानावर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान ‘अ’ विरुद्ध हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना २४ नोव्हेंबर रोजी युनिव्हर्सिटी ऑफ दोहा मैदानावर संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध (UAE) होईल. हे सुरुवातीचे सामने जिंकून भारतीय संघ थेट उपांत्य फेरी गाठण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
भारत ‘अ’ अपडेटेस संघ: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), सुर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्ष दुबे, हर्षित खान, अरविंद खान, यष्टिरक्षक, अरविंद खान, यष्टिरक्षक. आणि आयुष बडोनी





