Rohit Pawar : “खरात प्रकरणातून सुटण्यासाठी आर्थिक रॅकेट” – रोहित पवार
अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट सक्रीय आहे.

Rohit Pawar – अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट सक्रीय आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रस(शप) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी, व्यावसायिक अडकले आहे. त्या प्रकरणातील एक टक्के सत्य देखील समोर आलेले नाही. जे काही समोर आले आहे, ते केवळ छोटे मासे आहेत.
पण यामध्ये अनेक मोठे मासे देखील असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय म्हणून हे प्रकरण नोंद होणार आहे. कारण या प्रकरणाच्या तपासातून सुटका करून घेण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत असल्याची माहिती समजत आहे.
मोठमोठ्या रकमा घेऊन अनेकांना यातून अलगद बाहेर काढले जात आहे. ज्यांना या प्रकरणातून बाहेर काढायचे आहे, त्यांना अशोक खरातविरोधात फसवणूक केल्याची तक्रार दाखल करायला सांगितले जाते आहे.
आणि या प्रकरणातून बाहेर काढले जाते, अशी ही पद्धती सुरू असल्याची माहिती आहे. याची शहानिशा करून गृहमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.





