विमान उडत असताना दोन पायलटमध्ये मारामारी

पॅरिस – एअर फ्रान्स या विमान कंपनीच्या विमानात दोन वैमानिकांची मारामारी झाल्याचा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हे विमान उडत असतानाच हा प्रकार घडला होता. यामुळे विमानाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रस्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
जून महिन्यात एअर फ्रान्सचे हे विमान जिनिव्हावरून पॅरिसला जात असताना हा प्रकार घडला होता. विमान उतरत असेपर्यंत या दोन्ही वैमानिकांमधील मारामारी सुरू होती. सुदैवाने विमान सुखरुप उतरले होते. या दोन्ही वैमानिकांमधील भांडणाचा परिणाम विमानाच्या उतरण्यावर झाला नव्हता. विमानाने टउड्डाण केल्यापासूनच या दोन्ही वैमानिकांमध्ये भांडणाला सुरुवात झाली होती.
त्यांनी एकमेकांची कॉलर पकडून थेट मारामारी करायलाही सुरुवात केली होती. विमानातील कर्मचाऱ्यांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला होता. एका कर्मचाऱ्याला मध्ये पडल्याबद्दल “प्रसाद’ही मिळाला होता. या दोन्ही वैमानिकांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास प्रान्सच्या तपास संसस्तेकडून करण्यात येतो आहे. (A fight between two pilots while the plane is flying)




