अमेरिकेच्या प्रसिध्द गायिकेने गायले राष्ट्रगीत, पंतप्रधान मोदींच्या पाया पडून घडवले भारतीय संस्कृतीचे दर्शन

अमेरिका – पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारताला संबोधित केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अमेरिकन गायिका मेरी मिलबेनने भारत देशाचं राष्ट्रगीत जन…गण…मन… गायले. त्यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया स्पर्श करत त्यांचा आशीर्वाद घेतला. अमेरिकन गायिका मेरी मिलबेन हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमात सहभागी होणं ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट असल्याचे तिने सांगितले. “पंतप्रधान मोदी आणि भारतीयांना मी माझे कुटुंब मानते. त्यामुळे, भारताचं राष्ट्रगीत गायला मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. अमेरिका आणि भारताची राष्ट्रगीते लोकशाही आणि स्वातंत्र्याबद्दल भाष्य करतात. एका स्वतंत्र देशाची ओळख ही तेथील स्वतंत्र लोकांमुळेच असते,” असे मेरी मिलबेन म्हणाली. मॅरी मिलबेन 38 वर्षांच्या गायिका भारतातही प्रसिद्ध आहेत. तिचे ‘ओम जय जगदीश हरे’ हे गाणं लाखो भारतीयांमध्ये चर्चेत आहे. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मेरी मिलबेन हिने पंतप्रधान मोदींच्या संयुक्त राष्ट्र मुख्यालयात परफॉर्म केले होते.
American singer Mary Milliben, after singing India’s national anthem, touches Prime Minister Modi’s feet… Earlier Prime Minister of PNG, in a moving gesture, had bowed down in reverence. The world respects PM Modi’s powerful spiritual aura and rootedness in Indian values and… pic.twitter.com/qoA7ALLA3U
— Amit Malviya (@amitmalviya) June 24, 2023
#WATCH | Award-winning international singer Mary Millben performs the National Anthem of India at the Ronald Reagan Building in Washington, DC pic.twitter.com/kBYkrnsu0N
— ANI (@ANI) June 23, 2023
रोनाल्ड रेगन येथे जमलेल्या भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “तुम्ही सर्वांनी अमेरिकेत महान भारताचं एक चित्र तयार केले आहे. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. मला अमेरिकेत हा जो काही सन्मान मिळतोय त्याचं श्रेय तुम्हालाच जातं. 140 कोटी भारतीयांचा आत्मविश्वास हाच भारतीयांच्या प्रगतीचा मुख्य मार्ग आहे. त्यामुळेच आपला देश आज प्रगतीपथावर आहे. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीमुळे आपण हा आत्मविश्वास गमावला होता. परंतु नव्या भारताने तो आत्मविश्वास आपण परत मिळवला आहे.”





