Nagar | श्रीरामपूरातील डॉक्टरला 10 लाखास फसविले
Updated On:

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- शहरातील एका डॉक्टरला शेअर्स मार्केटमध्ये जास्त परतव्याचे आमिष दाखवून 10 लाख 8 हजार रुपयास गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. प्रशांत चव्हाण यांच्याशी सुहास रायकर व देवीदास रायकर (दोघे रा. पिंपळगांव माळवी, ता. नगर) या दोघांनी गोड बोलून त्यांच्याबरोबर ओळख करून, शेअर्समध्ये जास्त परतावा मिळवून देवू असे सांगून, डॉ. चव्हाण यांना 10 लाख 8 हजार रुपये गुंतवणूक करायला लावून त्यांची फसवणूक केली.
याप्रकरणी डॉ. प्रशांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सुहास रायकर, देवीदास रायकर यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके हे करत आहे.





