जिल्हा परिषद भालगाव शाळेत मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत लोकसहभागातून उभारण्यात आला डिजिटल स्मार्ट क्लास

नेवासा (प्रतिनिधी) – वर्ग खोलीच्या भिंतीवर रंगरंगोटी केल्याने झालेल्या बोलक्या भिंती,सामान्य ज्ञान, तंत्रज्ञान आधारीत संगणक माहिती,इंग्रजी तक्ते,गुगल सेवा लोगो आणि छतावर अवतरलेली आकाशगंगा, अंतराळवीर,चंद्रयान,हुबेहूब प्राणी,पक्षी आणि विद्यार्थीप्रिय कार्टून्स यांसह अध्यापनासाठी इंटरअक्टिव्ह पॅनल,सुसज्ज भौतिक सुविधांसह उभारलेल्या मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद भालगाव शाळेतील इयत्ता तिसरीच्या डिजिटल टू स्मार्ट क्लासला गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड व केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सुरू केलेल्या ‘मिशन आपुलकी’ उपक्रमातंर्गत वर्गशिक्षिका शितल झरेकर यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून उभारलेल्या डिजिटल टू स्मार्ट क्लासला रंगरंगोटी करून आर्ट ऑफ इंटिग्रेशन व बाला संकल्पनेतून बोलक्या भिंती रंगवण्याचे काम सुरू असताना गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी भेट देऊन कामाचे कौतुक केले.आणि उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता सावंत यांनी केले.यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड,नेवासा बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद,केंद्रप्रमुख कमल लाटेआदींसह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी वर्ग खोलीचे रंगकाम करणारे कर्जत राशीन येथील श्रीकांत आर्ट चे गणेश धनवडे व संतोष सुतार यांचा सत्कार शाळेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वर्गशिक्षिका शितल झरेकर यांनी मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत मागील वर्षीपासून सुरू असलेल्या कामाचा आढावा यावेळी सादर केला. लोकसहभागातून सुमारे ऐंशी हजार रुपये जमवत वर्गाचा झालेल्या कायापालट याची यशोगाथा सादर केली.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी कराड म्हणाले की, मिशन आपुलकी या उपक्रमांतर्गत पालक व ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन शाळेसाठी दिलेले योगदान अनमोल आहे. विद्यार्थ्यांना वर्गातील बोलक्या भिंतीतून आनंददायी शिक्षणाची आवड निर्माण होईल व त्याला डिझिटल युगात ई लर्निंग सुविधाची जोड मिळेल. पालकांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून साकारलेल्या डिजिटल टू स्मार्ट क्लास बद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून अभिनंदन देखील केले. यावेळी केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले.या उभारलेल्या डिजिटल टू स्मार्ट क्लासच्या भौतिक सुविधा ,बोलक्या भिंती व रंगरंगोटी पाहून चांगल्या शैक्षणिक वातावरण निर्मिती बद्दल सरपंच मंगल खरात,जेष्ठ मार्गदर्शक दादासाहेब खरात,उपसरपंच बाळासाहेब आहेर,पोलीस पाटील बाळकृष्ण भागवत,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रमेश तनपुरे,उपाध्यक्ष स्वाती खरात,पालक बबन वाखुरे,संभाजी नळघे,अरुण खरात,नामदेव आहेर,देवराव आहेर,रविंद्र आहेर,किशोर आहेर, ज्ञानेश्वर कोरडे,तौसीम शेख,विलास तनपुरे,सोमनाथ बोस्टे,देवराव राशिनकर,ज्ञानेश्वर गव्हाणे,भारत पवार आदींनी कौतुक केले आहे.यावेळी पदवीधर शिक्षिका सरस्वती लोंढे, मनीषा साळवे,जनाबाई जाधव ह्या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक राहुल आठरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अमोल तुपे यांनी मानले.
मिशन आपुलकीने उभारला डिजिटल स्मार्ट क्लास
जिल्हा परिषद अहमदनगर च्या मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत व सर्व पालकांच्या पुढाकाराने सुमारे ऐंशी हजार रुपये जमवत वर्गातील भौतिक सुविधा व रंगरंगोटी करत बोलक्या भिंती तयार केल्या आहे. विद्यार्थ्यांनाआनंददायी शिक्षण घेण्यास वातावरण निर्मिती होऊन नियमित उपस्थिती राहील.
शितल झरेकर -वर्गशिक्षिकाआनंददायी हायटेक शिक्षण…
जिल्हा परिषद भालगाव शाळेत मिशन आपुलकीतुन उभारलेल्या इयत्ता तिसरीच्या डिजिटल टू स्मार्ट क्लास ला रंगरंगोटी सुरू असताना भेट दिली. वर्गातील भौतिक सुविधा, ई लर्निंग साठी इंटरॅक्टिव्ह पॅनल व बोलक्या भिंती, विविध भाषा गणित शैक्षणिक साहित्य यामुळे आनंददायी पद्धतीने हायटेक शिक्षण मिळेल.
शिवाजी कराड (गटशिक्षणाधिकारी नेवासा)





