Ajit Pawar: ‘अजितदादा अमर रहे’! लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला; महिलांनी टाहो फोडला
Ajit Pawar:राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री असलेल्या अजित पवारांचे काल (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झाले.

Ajit Pawar:राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री असलेल्या अजित पवारांचे काल (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या या अचानक एक्झिटने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांचे पार्थिव काल विद्याप्रतिष्ठान येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.
आता पार्थिव त्यांच्या मूळ निवासस्थानी काटेवाडीत आणण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात काटेवाडीत जनसमुदाय लोटला आहे. वृद्ध, तरुण, महिलांनी मोठी गर्दी केली आहे. आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी टाहो फोडलाय.
बारामतीकरांचे अजित पवार यांच्यावर प्रचंड प्रेम होते. अजित पवारही अनेक सण आपल्या काटेवाडीच्या घरी साजरे करत. त्यामुळे अजित पवार यांच्याशी येथील जनतेची नाळ जुळलेली होती. त्यामुळे आज अजित पवार यांचे पार्थिव काटेवाटी येथील निवासस्थानी आणल्यानंतर त्यांच्या घराबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी आवरताना पोलिसांना प्रचंड अवघड जात आहे.
गर्दी इतकी आहे की, रोहित पवार यांनी बंगल्याच्या गेटवर चढत बाहेरच्या गर्दीला शांत राहण्याचे आवाहन केले. रोहित पवारांनी गर्दीतील लोकांना विनंती करुन शांत बसवण्याचा प्रयत्न केला. Ajit Pawar:
अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी बारामती येथे अनेक बडे राजकीय नेते दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर बारामती विमानतळावर पोलिसांसह एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. Ajit Pawar:
हेही वाचा :





