मेलबर्न – ट्रेव्हिस हेडचे दीडशतक व डेव्हीड वॉर्नरचे शतक, ऍडम झम्पासह सर्वच गोलंदाजांनी केलेली अफलातून गोलंदाजी तसेच पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ-लुईसद्वारे बदलेली समिकरणे यांच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तब्बल 221 धावांनी पराभव केला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखत इंग्लंडला व्हाइटवॉश दिला.
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 48 षटकांत 355 धावांचा डोंगर उभारला होता. सामन्यापूर्वी पाऊस झाल्यामुळे हा सामना 48 षटकांचा खेळवला गेला. सलामीवीर ट्रेव्हीस हेडने 130 चेंडूत 16 चौकार व 4 षटकार फटकावताना 152 धावांची खेळी केली. तब्बल 1 हजार दिवसांनंतर वॉर्नरनेही शतकी खेळी केली. त्याने 106 धावांच्या खेळीत 102 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व 2 षटकार फटकावले. इंग्लंडकडून ओली स्टोनने 4 गडी बाद केले.
A comprehensive victory helps Australia complete a 3-0 series whitewash against their arch-rivals 👊 #AUSvENG pic.twitter.com/ghGQD2tcLj
— ICC (@ICC) November 22, 2022
विजयासाठी 356 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 31.4 षटकांत 142 धावांवर संपुष्टात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस सुत्रांनूसार इंग्लंडसमोर 48 षटकांत 364 धावा करण्याचे आव्हान ठेवले गेले होते. इंग्लंडकडून जेसन रॉयने 33 व जेम्स विन्सने 22 धावा केल्या. अन्य फलंदाजांनी नांगी टाकली.
#FIFAWorldCup2022 : सौदी अरेबियाचा अर्जेन्टिनावर सनसनाटी विजय
ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने सर्वाधिक 4 गडी बाद केले. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाने तीन टी-20 सामन्यांची मालिकाही 2-0 अशी जिंकली होती. ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर इंग्लंडचा या पहिल्याच मालिकेत दारुण पराभव झाला.