Shweta Tiwari: श्वेता तिवारींच्या घरात डिलिव्हरीसोबत आला झुरळ! थेट FDA कमिश्नर तुकाराम मुंढेंना केली मदतीची मागणी
Shweta Tiwari श्वेता तिवारी यांनी नुकतेच एका क्विक-कॉमर्स ग्रोसरी डिलिव्हरी अॅपवरून कोल्ड ड्रिंक्स ऑर्डर केल्याचे सांगितले आहे. मात्र, ऑर्डर मिळाल्यानंतर त्यांच्या घरात झुरळ आल्याचे त्यांच्या व्हिडीओत दिसत आहे. यानंतर त्यांनी या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

Shweta Tiwari: अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या त्यांच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आल्या आहेत. श्वेता यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे म्हणजेच FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. एका क्विक-कॉमर्स डिलिव्हरीदरम्यान आलेल्या वस्तूंसोबत झुरळ घरात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
श्वेता तिवारी यांनी नुकतेच एका क्विक-कॉमर्स ग्रोसरी डिलिव्हरी अॅपवरून कोल्ड ड्रिंक्स ऑर्डर केल्याचे सांगितले आहे. मात्र, ऑर्डर मिळाल्यानंतर त्यांच्या घरात झुरळ आल्याचे त्यांच्या व्हिडीओत दिसत आहे. यानंतर त्यांनी या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
श्वेता तिवारींनी काय म्हटलं?
श्वेता यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर झुरळाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्या घरात फिरणारे झुरळ दाखवताना दिसत आहेत. त्यांनी संबंधित डिलिव्हरी प्लॅटफॉर्मला टॅग करण्यासोबतच FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही टॅग केले.
व्हिडीओमध्ये श्वेता यांनी तुकाराम मुंढे यांना थेट मदतीची विनंती केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, घरात कोल्ड ड्रिंक्सची डिलिव्हरी आल्यानंतर त्यासोबत झुरळही आल्याचे त्यांनी सांगितले.
“मुंढे जी, सध्या आमच्या घरात झुरळ येत आहेत. आपण कुठे आहात, कृपया याकडे लक्ष द्या,” अशा आशयाचे आवाहन त्यांनी केले.
या प्रकारामुळे श्वेता यांनी अन्नपदार्थ आणि डिलिव्हरीच्या स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, या प्रकरणाची अधिकृत चौकशी किंवा संबंधित कंपनीकडून काय स्पष्टीकरण देण्यात आले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Shweta Tiwari Vs Cockroaches 🔥😂😂😂😂 pic.twitter.com/eGLpp4E2T7
— desi mojito (@desimojito) August 19, 2026
तुकाराम मुंढे का चर्चेत?
महाराष्ट्र FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या त्यांच्या कारवाईमुळे चर्चेत आहेत. अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्याच्या त्यांच्या भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
त्यामुळे अनेक नागरिक आपल्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. श्वेता तिवारी यांनीही आपल्या घरातील या प्रकाराची माहिती देण्यासाठी त्यांना टॅग केले.
‘द ट्रेटर्स 2’मध्ये दिसत आहेत श्वेता
दरम्यान, श्वेता तिवारी सध्या ‘द ट्रेटर्स 2’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. या शोचे सूत्रसंचालन करण जोहर करत आहेत. शोमध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध कलाकार आणि सोशल मीडिया स्टार्स सहभागी झाले आहेत. श्वेता यांनी शोमध्येही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शोमधील त्यांच्या वक्तव्यांची आणि इतर स्पर्धकांसोबतच्या त्यांच्या बॉन्डचीही चर्चा होत आहे.
अशातच त्यांच्या घरात झुरळ आल्याच्या व्हिडीओमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आता या प्रकरणावर FDA कडून किंवा संबंधित डिलिव्हरी प्लॅटफॉर्मकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे.





