चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा झाला स्फोट.. घरात लागली आग ! चार मुलांचा मृत्यू.. आई वडील गंभीर जखमी

Mobile blast accident : जनता कॉलनीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका मजुराच्या घरात शॉर्टसर्किटमुळे मोबाईलचा स्फोट झाला आणि खोलीला आग लागली. खोलीत उपस्थित चार मुले गंभीररीत्या भाजली. मुलांना वाचवण्यासाठी आलेले दाम्पत्यही भाजले. मेरठमधील मोदीपुरमच्या कॉलनीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.
लोकांनी पोलिसांना कळवले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारादरम्यान चारही मुलांचा मृत्यू झाला. सध्या दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
चारही मुलांच्या मृत्यूनंतर मुलांच्या आईला गंभीर अवस्थेत दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. | Mobile blast accident
नेमकं काय झालं ?
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिखेडा येथे राहणारा जॉनी (४१) हा मजूर म्हणून काम करतो. ते पत्नी बबिता (३७) आणि चार मुले सारिका (१०), निहारिका (८), गोलू (६) आणि कल्लू (५) यांच्यासह मोदीपुरम येथील जनता कॉलनी येथे एका घरात भाड्याने राहतात. | Mobile blast accident
शनिवारी सायंकाळी खोलीत मुले खेळत होती. खोलीतील पलंगावर वायरी विखुरलेल्या होत्या आणि मुले मोबाईल चार्जर इलेक्ट्रिकल बोर्डला लावत होते. चार्जर बसवताना शॉर्ट सर्किट झाला. वायरला आग लागल्याने मोबाईलचा स्फोट होऊन बेडने पेट घेतला. | Mobile blast accident
त्याचवेळी आगीने वेढलेल्या मुलांनी आरडाओरडा सुरू केला. स्फोट आणि मुलांचा आवाज ऐकून जॉनी आणि बबिता स्वयंपाकघरातून खोलीकडे धावले. दोघांनीही जळालेल्या अवस्थेत मुलांना आगीतून बाहेर काढले. मुलांना वाचवताना बबिता आणि जॉनीही गंभीररित्या भाजले. जॉनीच्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी आले.
उपचारादरम्यान सारिका आणि कल्लूचाही मृत्यू झाल्याचे पोलीस स्टेशन प्रभारी मनेश कुमार यांनी सांगितले. कुटुंबीय आधी शवविच्छेदनास नकार देत होते पण नंतर शवविच्छेदन केले गेले. वडील जॉनी यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर आई बबिता यांना गंभीर अवस्थेत दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. | Mobile blast accident
एसपी सिटी आयुष विक्रम सिंह यांनी सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मुले आणि दाम्पत्य गंभीररित्या भाजले. यामध्ये चारही मुलांचा मृत्यू झाला आहे. डीएम दीपक मीना यांनी सांगितले की, संपूर्ण घटनेचा अहवाल नगर दंडाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला आहे. आर्थिक मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठवला येणार असल्याचे देखील समजते. | Mobile blast accident





