भांडणे पाहणाऱ्याला सिमेंटच्या गट्टूने मारहाण 

पिंपरी – भांडणे पाहत थांबलेल्या नागरिकाला चार जणांनी लाथा-बुक्‍यांनी तसेच सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 16) दुपारी साडेतीनच्या सुमारास संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली.

अमोल माणिक कोळी (वय 37, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शुभम राहुल आलकुटे (वय 22, रा. नेहरूनगर, पिंपरी), अमित बनकर, शशांक वाळवे, अमोल मोरे (सर्व, रा. विश्रांतवाडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी अमोल संत तुकारामनगर येथून पायी जात असताना रस्त्यावर काही मुलांचे भांडण सुरु होते. भांडण पाहण्यासाठी ते थांबले असता आरोपींनी आपसांत संगनमत करून कोळी यांना लाथा-बुक्‍यांनी तसेच सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. अमोल यांच्या चेहऱ्यावर व बरगडीला दुखापत झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.