nagar | आव्हाड यांच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संगमनेर, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. मात्र, मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं.
अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी यामुळे भाजप आक्रमक झाला. त्यांनी निषेध करत हा मुद्दा जोरदार लावून धरला आहे. त्यांच्याविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर भाजप अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष विकास जाधव यांच्या तक्रारीनंतर कलम 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांततेचा भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.



