पिंपरी | आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

कामशेत (वार्ताहर) – केंद्रातील भाजप सरकारच्या योजनांची माहिती देणारा फलक द्रुतगती मार्गावर लावण्यात आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भरारी पथकाने दिलेल्या फिर्यादीवरून मच्छिंद्रनाथ छबू दाभाडे (वय ४०, रा. बौर, ता. मावळ) यांच्यावर प्रिव्हेशन ऑफ डिफेस्मेंट प्रॉपर्टी एक्ट १९९५ चे कलम ३ नुसार कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून मावळ लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात म्हणजेच येत्या १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच आचारसंहिता लागू केली. निवडणूक आयोगाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे.
तसेच सी व्हिजील अँपवर नागरिकांना ऑनलाइन तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशीच तक्रार एका नागरिकाने केली असता मावळ लोकसभा कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेचे नियमभंग करणाऱ्या भरारी पथकाने तक्रारदाराच्या तक्रारीप्रमाणे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत बौर (ता. मावळ) येथील फ्लेक्सवर ही कारवाई केली. पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.





