Satara | शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

सातारा, (प्रतिनिधी) – महामार्गावरील उडतारे फाटा येथे एसटीने दुचाकीला ओव्हरटेक केल्यानंतर त्याचा राग आल्याने सीआरपीएफमधील जवान व त्याच्या साथीदाराने एसटी चालकाला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजय गणपत शिर्के (वय 31, मूळ रा.आढूळ, ता.पाटण सध्या काश्मीर) व रोहीत रघुनाथ साळुंखे (वय 24, रा. चिखली, पुणे) या दोघांविरुध्द विलास भगवान उमापे (वय 47, रा. उंब्रज ता.कराड) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यातील अजय शिर्के हा सीआरपीएफ जवान आहे.
पुरुष भिक्षेकरीगृहातून एक जण बेपत्ता
सातारा,- पुरुष भिक्षेकरी गृहातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनेश धरमसिंग यादव (वय 50, मुळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. पुरुष भिक्षेकरी गृह, सातारा) हे दि. 5 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.
विनयभंग केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा
सातारा- मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये महिलांचाही समावेश असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरात घुसून मारहाण तसेच घरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रुक्साना चंदनशिवे, तनुजा विकास चंदनशिवे, दिव्या अभिजीत खंडागळे, स्नेहल गवळी,
गौतम चंदनशिवे, विकास चंदनशिवे, अभिजीत खंडागळे (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. प्रतापसिंह नगर, सातारा) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.





