पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घराजवळ आढळला बॉम्ब, पोलिसांच्या सतर्कतेने टळला घातपात
Updated On:

चंडीगड – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या येथील निवासस्थान परिसरात जिवंत बॉम्ब आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तसेच बॉम्बशोधक पथक या परिसरात दाखल झाले. पोलिसांनी बॉम्ब आढळलेला परिसर सील केल्याचीही माहिती आहे. अधिक माहितीनुसार, हा बॉम्ब पंजाब व हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांसाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडपाशी आढळला जेथून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याची निवासस्थाने अगदी जवळ आहेत.
चंडीगडचे आपत्ती व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी संजीव कोहली हे यावेळी म्हणाले की, येथे एक जिवंत बॉम्ब सापडला आहे. तो पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने निकामी करण्यात आला आहे. लष्कराच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. तसेच, परिसराचीही नाकेबंदी करण्यात आली आहे. याप्रकरणी, पुढील तपास सुरू आहे.





